बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षपदी संतोष पवार यांची निवड ...!
बिजवडी,ता.10: बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ सातारा जिल्हा अध्यक्ष पदावर संतोष शिवाजी पवार यांची महाराष्ट्र राज्य अध्यक्ष एस आर भोसले यांनी नियुक्ती केली आहे.
सांगली येथे पार पडलेल्या विभागीय बैठकीला कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष संजय दिनकर खरात व प्राथमिक शिक्षक संघाचे सुरज तुपे उपस्थित होते .बहुजन अधिकारी कर्मचारी यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे संघटन राज्यात कार्यरत असून सातारा जिल्हयात या महासंघाची जबाबदारी संतोष पवार यांच्यावर देण्यात आली आहे .
या निवडीबद्दल संतोष पवार यांचे प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर ,माण चे गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, शिक्षण विस्तार अधिकारी रमेश गंबरे आणि प्राथमिक शिक्षक समिती,प्राथमिक शिक्षक संघ,कास्ट्राईब शिक्षक संघटना,प्रहार शिक्षक संघटना,जूनी पेन्शन संघटना,क्रास्टाईब शिक्षक संघटनेचे माण तालुकाध्यक्ष लक्ष्मण महानवर,पदवीधर शिक्षक संघटना,जिल्हा मध्यवर्ती कर्मचारी संघटना,फूले शाहू आंबेडकर विद्वत सभा ग्रामसेवक संघटना ,या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले .
फोटो - बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षपदी संतोष पवार यांची निवड झालेबद्दल सत्कारप्रसंगी उपस्थित मान्यवर
Comments
Post a Comment