तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत रयत इंग्लिश मिडीयम स्कूलचे उज्वल यश...!
बिजवडी : माणदेशी चॅम्पियन्स म्हसवड व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने माण तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत दहिवडी ता.माण येथील
रयत इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वैयक्तिक व सांघिक खेळात उज्वल यश मिळवले आहे.
महाराष्ट्र राज्य क्रीडा युवक कल्याण व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा आयोजित जिल्हास्तरीय आट्यापाट्या खेळाच्या स्पर्धेत रयत इंग्लिश मीडियम स्कूलच्या 17 वर्षांखालील मुलींचा संघ उपविजेता ठरला.त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.या संघात इकरा इम्रान तांबोळी,अपेक्षा भाऊसाहेब जाधव,अलविरा वसीम तांबोळी,सेंजल माधव भोंडवे,कल्याणी सचिन चव्हाण,अक्षरा वैभव गुरसाळकर,अक्षरा भिंगारे,गौरी जाधव,लीना नंदकुमार शिंदे,स्फूर्ती संतोष इंगळे,श्रेया कांतीलाल खाडे पाटील यांनी सहभाग घेतला होता.तसेच इयत्ता 10 वी च्या विराज पवार यांने गोळफेक या वैयक्तिक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवले.
या यशाबद्दल सर्व ग्रामस्थ दहिवडी तसेच शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापिका सौ.भारती प्रदीप जाधव यांनी सर्व खेळाडू विद्यार्थिनींचे कौतुक केले.
सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षिका योगिनी वाघमारे यांचे तसेच स्वामी सर व खिलारे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो - शालेय स्पर्धेत उज्वल यश मिळवलेले रयत इंग्लिश मिडीयम स्कूलचे खेळाडू...
Comments
Post a Comment