चैतन्य अकँडमीतली शिस्त विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतेय...!- सौ.सोनियाताई गोरे ; दहिवडीत चैतन्य माणदेश पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न


बिजवडी,ता.13 : चैतन्य करीयर अकँडमीतले शिक्षण व शिस्त विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवत असून आज असंख्य विद्यार्थी देशसेवा करत आहेत. याठिकाणी फक्त विद्यार्थी घडवण्याचे कार्य घडत नसून समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.त्यांच्या कार्याचा गौरव करक त्यांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याला प्रेरणा देण्याचे अतुलनीय असे कार्य केले जात असल्याचे प्रतिपादन सौ.सोनिया जयकुमार गोरे यांनी केले.
 दहिवडी ता.माण येथील चैतन्य करियर अकँडमीच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत चैतन्य माणदेश पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना चैतन्य माणदेश पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.पत्रकार दिनानिमित्त माण खटावमधील पत्रकारांचाही सन्मान करण्यात आला.याप्रसंगी सपोनि दत्तात्रय दराडे,सपोनि घनशाम सोनवणे,नगराध्यक्षा सौ.निलम जाधव ,माजी शिक्षण सभापती अँड.भास्करराव गुंडगे,रेणू येळगावकर,माजी पं.स.सभापती अतुल जाधव आदी मान्यवर,पालक,विद्यार्थी उपस्थित होते.
  सौ.सोनियाताई गोरे म्हणाल्या,आज मलाही चैतन्य सामाजिक पुरस्कार देण्यात आला असून तो मला राज्याचे कँबिनेट मंत्र्यांच्या हस्ते मिळणार होता.त्याचा आनंद खूप होता पण कँबिनेटमंत्री या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत त्यामुळे तो आनंद मला घेता आला नाही.आध्यात्मिक कार्य ही काळाची गरज असून ते कार्य पुढे नेण्याचे काम छोटूकाका कुलकर्णी करत आहेत.त्यांच्या या आध्यात्मिक कार्याच्या पाठीशी आम्ही कायम पाठीशी राहू असेही त्यांनी सांगितले.यावेळी सपोनि घनशाम सोनवणे,रेणू येळगावकर आदींनी मनोगते व्यक्त केली.
 यावेळी प्रास्ताविकात संदीप खाडे यांनी अकँडमीची माहिती सांगत गुणवंत विद्यार्थी तसेच पुरस्कारप्राप्त विविध मान्यवरांच्या कार्याची माहिती दिली.
सूत्रसंचालन इंद्रायणी जवळ व आप्पासाहेब गायकवाड यांनी केले.

चौकट - ग्रामविकासमंत्र्यांच्या सौभाग्यवतींच्या साधेपणाचे कौतुक....
प्रमुख पाहुण्या सोनिया गोरे यांना व्यासपीठावरती बसण्यासाठी आलिशान सोफा ठेवण्यात आला होता.मात्र मिसेस मंत्रीमहोदय असतानाही त्यांनी आपला साधेपणा दाखवत त्या सोफ्यावर बसण्यास नकार दिला.त्यांना सर्वच उपस्थित पाहुणे व आयोजकांनी विनंती करूनही त्यांनी तो आलिशान सोफा बाजूला काढण्याची विनंती करून साधी खुर्ची आणण्यास सांगितले. व्यासपीठावर साधी खुर्ची आणल्यानंतरच त्या आसनस्थ झाल्या.त्यांच्या या साधेपणाचे कौतुक उपस्थितांकडून करण्यात आले. सत्ता,खुर्ची असो वा नसो आपण जमिनीवरच राहायच हे आपले पती ना.जयकुमार गोरे यांचा आदर्श घेऊन त्या त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवताना दिसून येत आहेत.त्यांच्या शुभहस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना चैतन्य माणदेश भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्रत्येक पुरस्कारप्राप्त व्यक्तींची त्या आपुलकीने चौकशी करत त्यांच्या कार्याचे कौतुक करत होत्या.

फोटो - दहिवडी ता.माण येथे सौ.सोनियाताई गोरे यांच्या हस्ते आध्यात्मिक क्षेत्रातला चैतन्य माणदेश पुरस्कार स्विकारताना छोटूकाका कुलकर्णी...

Comments

Popular posts from this blog

छोटूकाकांच्या आध्यात्मिक कार्याच्या पाठीशी कायम....... ! - सौ.सोनियाताई गोरे ; छोटूकाका कुलकर्णी चैतन्य माणदेश पुरस्काराने सन्मानित

...79 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दादांची 45 वर्षांची अखंडीत पत्रकारिता...!