छोटूकाकांच्या आध्यात्मिक कार्याच्या पाठीशी कायम....... ! - सौ.सोनियाताई गोरे ; छोटूकाका कुलकर्णी चैतन्य माणदेश पुरस्काराने सन्मानित
बिजवडी - वावरहिरे ता.माण येथे ओम चैतन्य उपासना केंद्रात छोटूकाका कुलकर्णी चांगले आध्यात्मिक कार्य करत आहे.आध्यात्मिक कार्य ही काळाची गरज असून ते कार्य पुढे नेण्याचे काम छोटूकाका करत आहेत.माणखटाव तालुक्यात ते धार्मिक,आध्यात्मिक मार्गदर्शन करत आहे.त्यांच्या या कार्याच्या पाठीशी आम्ही कायम राहू असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या सौभाग्यवती सौ.सोनियाताई गोरे यांनी केले.
दहिवडी ता.माण येथील चैतन्य करियर अकँडमीच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत जिल्ह्यातील कर्तृत्ववान व्यक्तींना चैतन्य माणदेश पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दहिवडी पोलीस स्टेशनचे सपोनि दत्तात्रय दराडे,वडूज पोलीस स्टेशनचे सपोनि घनशाम सोनवणे,दहिवडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ.निलम जाधव ,सातारा जि.प.चे माजी शिक्षण सभापती अँड.भास्करराव गुंडगे,भाजपच्या पदाधिकारी रेणू येळगावकर,माजी पं.स.सभापती अतुल जाधव आदी मान्यवर,पत्रकार, पालक,विद्यार्थी उपस्थित होते.
सौ.सोनियाताई गोरे म्हणाल्या, ओम चैतन्य उपासना केंद्रात प्रत्येक शनिवारी मोफत होमहवन तसेच विविध धार्मिक कार्य केले जातात. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक भक्तगण उपस्थित राहत असतात.छोटूकाका निस्वार्थी पणे धार्मिक कार्य करत असून आध्यात्मिक क्षेत्रातला चैतन्य माणदेश पुरस्कार देऊन छोटूकाका कुलकर्णी यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले आहे.त्यांच्या या कार्याला आमच्या शुभेच्छा असून आम्ही त्यांच्या पाठीशी कायम राहू.
यावेळी छोटूकाका कुलकर्णी यांनी पुरस्कार देऊन गौरव केल्याबद्दल सौ.सोनियाताई गोरे यांचे व चैतन्य अकँडमीचे आभार मानले.
फोटो - दहिवडी ता.माण येथे सौ.सोनियाताई गोरे यांच्या हस्ते आध्यात्मिक क्षेत्रातला चैतन्य माणदेश पुरस्कार स्विकारताना छोटूकाका कुलकर्णी,शितल कुलकर्णी व कुटुंबिय...
Comments
Post a Comment