चैतन्य अकँडमीतली शिस्त विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतेय...!- सौ.सोनियाताई गोरे ; दहिवडीत चैतन्य माणदेश पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न
बिजवडी,ता.13 : चैतन्य करीयर अकँडमीतले शिक्षण व शिस्त विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवत असून आज असंख्य विद्यार्थी देशसेवा करत आहेत. याठिकाणी फक्त विद्यार्थी घडवण्याचे कार्य घडत नसून समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.त्यांच्या कार्याचा गौरव करक त्यांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याला प्रेरणा देण्याचे अतुलनीय असे कार्य केले जात असल्याचे प्रतिपादन सौ.सोनिया जयकुमार गोरे यांनी केले. दहिवडी ता.माण येथील चैतन्य करियर अकँडमीच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत चैतन्य माणदेश पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना चैतन्य माणदेश पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.पत्रकार दिनानिमित्त माण खटावमधील पत्रकारांचाही सन्मान करण्यात आला.याप्रसंगी सपोनि दत्तात्रय दराडे,सपोनि घनशाम सोनवणे,नगराध्यक्षा सौ.निलम जाधव ,माजी शिक्षण सभापती अँड.भास्करराव गुंडगे,रेणू येळगावकर,माजी पं.स.सभापती अतुल जाधव आदी मान्यवर,पालक,विद्यार्थी उपस्थित होते. सौ.सोनियाताई गोरे ...
Nice
ReplyDeleteहार्दिक शुभेच्छा💐💐💐
Deleteमनपुर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा
ReplyDelete