कोरोना काळात जनतेला पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्यास भाग पाडू नका...!-शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसलेंचा इशारा
बिजवडी - कोरोनाची महामारीमुळे सर्वच ठिकाणी संचारबंदी असून काही अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद आहे.अशा परिस्थितीत माणच्या उत्तरेस सर्वच गावांमध्ये तसेच पूर्व व पश्चिमेकडील बहुतांश गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई कित्येक दिवस सुरु आहे.पाण्यासाठी लोकांना अनेक मैल पायपीट करुनही हांडाभर पाणी सापडत नाही.यासाठी आतापर्यंत १४ ग्रामपंचायतींनी प्रशासनाकडो पाण्याची मागणी केली आहे.यासाठी या गावांचा अगोदर टंचाईत समावेश करण्याची गरज आहे.मात्र याबाबत तहसिल प्रशासन उदासीन दिसत असून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.कोरोना काळात बाहेर फिरण्यासाठी मज्जाव असताना पाण्यासाठी जनतेला रस्त्यावर उतरण्यास भाग पाडू नका असा इशारा माणच्या तहसिल कार्यालयाला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी दिला आहे.
पाण्याचे दुर्भिक्ष आणी कोरोनामुळे घरामधून बाहेर निघण्यास मज्जाव या दुहेरी संकटात जनता सापडली असताना माण महसूलच्या अधिकार्यांची कामातील कुचराई व दुर्लक्षित पणा कोरोना अगोदर पाणी पाणी करुन जनतेला तडपडायला लावतो की काय? अशी परिस्थिती निर्माण होत चालली आहे.
तरी शासकीय अधिकार्यांनी जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी लागलीच पाठपुरावा करावा अन्यथा रस्त्यावरती उतरुन शासकीय अधिकार्यांना जाब विचारु असा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी प्रसिध्दिपत्राद्वारे दिला आहे.
Comments
Post a Comment