कोरोना हा वायरस नसून दहशत....! - ह.भ.प. बंडातात्या कराडकर


बिजवडी : गेले वर्षभर कोरोनाचा खेळ खेळणारें सरकार आतां कोरोना लस घेण्यासाठीं परत एकदा कोरोनाची लाट आल्याचे नाटक करून भारतीयांना फसवत आहे व लुटत आहे. कोरोनाची कल्पना बिल गेट्स च्या डोक्यांतून निर्माण झाली असून भारतासह अनेक देश बिल गेट्सची खेळणी आहेत  हे जगातील अनेक तज्ञ ओरडून सांगत आहेत. तरीही लोकांचे डोळ्यांत धूळ फेकणें चालू आहे.त्यामुळे कोरोना हा वायरस नसून दहशत असल्याचे परखड मत ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे व्यक्त केले.
 ह.भ.प. बंडातात्या कराडकर म्हणाले , भारतात प्रतिवर्षी कॅन्सरने मरणाऱ्या रुग्णांची संख्या सरकारी माहितीनुसार साडेसात ते आठ लाख आहे.दारू पिऊन मरणाऱ्यांची संख्या अडीच लाख आहे. असे असतांना फक्त बनावट कोरोनाने मरणाऱ्या  रुग्णांची संख्या वाढवून सांगितली जाते. तंबाखू , तंबाखूजन्य व अन्य मादक पदार्थांचे उत्पादन, विक्री व सेवनावर कोणतेही बंधन नाही. यावरून सरकार दांभिक आहे हें सिद्ध होतें.कोरोनाला नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोरोनाची लक्षणे ताप , थंडी, सर्दी , कफ , खोकला अशी सामान्य असून तो जीवघेणा रोग नाही. ( मुळात कोरोनाच नाही ) त्यावर आयुर्वेदांत शेकडो उपाय आहेत पण सरकार त्या उपायांना प्राधान्य देत नाहीं. कारण ही औषधे बिल गेट्सची नाहींत. सरकारला नागरिकांना लुटून बिल गेट्सची सेवा करावयाची आहे. म्हणून लॉकडाऊन चे नाटक चालू आहे. यांतून जनतेचा उद्रेक झाला तर ती क्रांती असेल व न झाला तर दुसऱ्या पारतंत्र्याची नांदी असेल असेही ह.भ.प. बंडातात्या कराडकर सांगितले.शेवटी बोलताना ते म्हणाले की माझ हे वैयक्तिक मत असून यास कुठलाही संप्रदाय व संघटना जबाबदार नाही.

Comments

Popular posts from this blog

चैतन्य अकँडमीतली शिस्त विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतेय...!- सौ.सोनियाताई गोरे ; दहिवडीत चैतन्य माणदेश पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न

छोटूकाकांच्या आध्यात्मिक कार्याच्या पाठीशी कायम....... ! - सौ.सोनियाताई गोरे ; छोटूकाका कुलकर्णी चैतन्य माणदेश पुरस्काराने सन्मानित

...79 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दादांची 45 वर्षांची अखंडीत पत्रकारिता...!