संजय भोसलेंच्या शिवसेना स्टाईल दणक्यामुळे टंचाईग्रस्त गावांना मिळणार टँकरचे पाणी..!
बिजवडी -माण तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांचा टंचाईत समावेश होत नसल्याने पाण्याच्या टँकर पासून वंचित असलेल्या गावांच्या मागणीची दखल घेत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता.प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत टंचाईग्रस्त गावांचा टंचाईत समावेश करण्यात आल्याने संजय भोसलेंच्या प्रयत्नांना यश आले असून त्या गावांना लवकरच पाण्याचे टँकर सुरू होणार आहेत.
माण तालुक्यातील १४ गावांनी पाणीटंचाईमुळे प्रशासनाने टँकर सुरू करावा म्हणून मागणी केली होती.मात्र माण तालुक्यात टंचाई घोषित नसल्याने या गावांना पाणी मिळण्यास अडचणी निर्माण होत होत्या.यासंदर्भात वृत्तपत्रातून आवाजही उठवण्यात आला होता.
बहुतांश भागामध्ये पाण्याची तीव्र टंचाई मार्च महिन्यामध्येच जाणवू लागल्याने काही ग्रामपंचायतीनी पाणीटंचाईचे प्रस्ताव सादर केले होते. यानंतर ग्रामस्तरातील सरपंच ,सदस्य यांनी अधिकार्यांच्या गाठी भेठी घेऊन पाठपुरावे करुन देखील गावे टंचाईत न बसल्याने कोणताच मार्ग निघत नव्हता.
याबाबत वृत्तपत्रातूनही आवाज उठवण्यात आला होता.काही गावातील सरपंच,उपसरपंच ,सदस्यांनी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांना भेटून पाण्याबाबतचे गार्हाणे मांडले होते.याची दखल घेत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी या गावांना टँकर सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला होता.याबाबत माण खटावचे उपविभागीय अधिकारी शैलेश सुर्यवंशी यांचे सोबत संजय भोसले यांनी चर्चा करून भेटीसाठी गेले असता उपविभागीय अधिकारी भेटले नाहीत.यावेळी संजय भोसले यांनी दोन दिवसांत टंचाई घोषित न केलेस प्रांतांच्याच कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता.त्यानंतर काही तासांतच सहा गावे टंचाई ग्रस्त घोषीत केलेचा आदेश जाहीर करण्यात आला.
चौकट - माण तालुक्यातील पाणीटंचाईने त्रासलेल्या गावांना प्रशासनाची पाणीपुरवठा करण्यासाठी कोणतीच हालचाल दिसून येत नव्हती.लोक येऊन पाण्यासाठी आपल्याकडे गाऱ्हाणी मांडत होती.म्हणून आपण हा पाणीटंचाईचा विषय हाती घेत नेहमीप्रमाणे प्रशासनाविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले.त्यानंतर प्रशासनानेही तत्परता दाखवत सहा गावांचा टंचाईत समावेश करून संबंधित गावांची संयुक्त पाहणी केली.आज वारुगड ता.माण पाण्याच्या टँकरची पहिली खेप होत असल्याने पाण्यासाठी वणवण करणाऱ्यां व विकतचे पाणी घेणाऱ्या ग्रामस्थांना टँकरचे पाणी मिळणार आहे.
- संजय भोसले , शिवसेना उपजिल्हाप्रमुख सातारा
फोटो - बिजवडी गावात १५ दिवसापासून पाणीटंचाई सुरू असून प्रशासनाकडे मागणी करूनही टँकर सुरू होईल याबाबत साशंकता होती.मात्र शिवसेनेचे संजय भोसले यांनी हा विषय मार्गी लावल्याने एकदोन दिवसात गावाला टँकर सुरू होईल.ग्रामस्थांच्या वतीने संजय भोसले यांचे आभार.
- आप्पासो अडागळे ,सरपंच ग्रा.पं.बिजवडी ता.माण
Comments
Post a Comment