*प्रतिबंधित क्षेत्रात असल्याने शिक्षक बँकेच्या म्हसवड शाखेचे कामकाज बंद...! - व्हा.चेअरमन महेंद्र अवघडे
बिजवडी - माण तालुक्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे.विशेषत: म्हसवड शहर व परिसरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. यामुळे उपविभागीय अधिकारी माण-खटाव यांचेकडील व मुख्याधिकारी म्हसवड नगरपरिषद म्हसवड यांचेकडील आदेशान्वये संपूर्ण म्हसवड शहर प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करणेत आले आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षक सहकारी बँक सातारा च्या म्हसवड शाखेचे दैनंदिन व्यवहार मा. उपविभागीय अधिकारी माण-खटाव यांचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत बंद राहतील अशी माहिती शिक्षक बँकेचे व्हा.चेअरमन महेंद्र अवघडे व संचालक राजाराम खाडे यांनी दिली.
सभासद व ग्राहक यांनी आपल्या अत्यावश्यक आर्थिक व्यवहारा संबंधी आपले बँकेचे दहिवडी शाखेत अथवा म्हसवड शाखेच्या ७८८८००५८१० या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा.
तसेच कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व सभासद बंधू-भगिनीनी काळजी घ्यावी असे आवाहन व्हा.चेअरमन महेंद्र अवघडे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment