मलकापूरच्या ओम आगाशिव पतसंस्थेवर प्रशासन काय कारवाई करणार..!बीले न मिळाल्याने शेतकऱ्यांनी केली होती प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार ;
बिजवडी - मौजे जाधववाडी ,तोंडले ता.माण येथे ओम अगाशिव ग्रा.बि.शेती पतसंस्था मर्या. मलकापूर ता.कराड या संस्थेने चारा छावण्या चालवण्यास घेतल्या होत्या.छावणी काळात त्यांनी शेतकऱ्यांकडून चारा व पाणी विकत घेतल होत.शासनाचे अनुदान येऊनही या संस्थेने व छावणी चालकांनी संबंधित शेतकऱ्यांची बीले न देता त्यांची फसवणूक केली असल्याची लेखी तक्रार शेतकऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे केली होती.त्यामुळे या संस्था व चालकांविरोधात शेतकरीवर्गातून नाराजी व्यक्त होत असताना शेतकऱ्यांची बीले रखडवणाऱ्या या संस्थेवर प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मौजे जाधववाडी ,तोंडले ता.माण येथे ओम अगाशिव ग्रा.बि.शेती पतसंस्था मर्या. मलकापूर ता.कराड या संस्थेने चारा छावणी चालविली होती.या चारा छावणी चालकांनी व संस्थेने मनमानी कारभार करत शेतकऱ्यांची फसवणूक केली होती.शासनाकडून बीले मिळूनही शेतकऱ्यांचे चाऱ्याचे व पाण्याचे पैसे न देता त्यांची फक्त फसवणूक केली जात होती.चारा व पाणी बिलासाठी शेतकऱ्यांनी संस्था व छावणी चालक यांच्याकडे पाठपुरावा केला होता.तर त्यांनी दिलेले चेक अनेकदा बाऊन्सही झाले होते.ओम आगशिव ग्रा.बि.शेती सहकारी पतसंस्था मर्या ,मलकापूर ता.कराड या संस्थेने कार्यक्षेत्र नसतानाही माण तालुक्यात चारा छावण्या चालविल्या मात्र शेतकऱ्यांची बीले दिली नाहीत.यात प्रशासनाने फक्त बघ्याची भूमिका घेतली होती.
त्यामुळे या संस्थेविरोधात शेतकरीवर्गातून तीव्र नाराजी व्यक्त करून श्रीमती पद्मावती विष्णू भोसले , सागर कदम ,या शेतकऱ्यांनी ओम आगाशिव पतसंस्थेविरोधात थेट प्रांताधिकाऱ्यांकडेच लेखी तक्रार केली होती.यात शासनाने सदर प्रकरणाची सखोल चौकशी करुन आर्थिक गैरव्यवहार केला आहे का हे ही तपासून संस्थेविरोधात सखोल चौकशी करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली होती.यावर प्रांताधिकारी कोणती कारवाई करणार व शेतकऱ्यांना कसा न्याय देणार हे पाहावे लागेल.
चौकट - बिजवडी ता.माण येथील चारा छावणीत भ्रष्ट्राचार झाल्याची तक्रारीनंतर संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात आलेत.मलकापूर येथील ओम आगाशिव पतसंस्थेनेही शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची तक्रार प्रांताधिकाऱ्यांकडे झाली आहे.त्यामुळे ओम आगाशिव पतसंस्थे विरोधात बिजवडीच्या छावणी प्रमाणे कारवाई होऊन गुन्हे दाखल होणार का की प्रशासन या संस्थेला पाठीशी घालणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
फोटो - मलकापूर ता.कराड येथील ओम आगाशिव पतसंस्थेने छावणी चालवत असतानी शेतकऱ्यांची फसवणूक केलेली हीच ती जाधववाडी ता.माण येथील चारा छावणी....
Comments
Post a Comment