माण आणि खटाव तालुक्यात ऑक्सिजन सुविधेसह सुसज्ज कोव्हिड सेंटर उभारणार..! – प्रभाकर देशमुख

बिजवडी - राज्यामध्ये कोव्हिड संसर्गाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात पसरत आहे. माण आणि खटाव मध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग वाढत आहे त्यामुळे रुग्णांकडून ऑक्सिजन बेडची मागणी सातत्याने केली जात आहे. शासनाकडून व खासगी संस्थांकडून ऑक्सिजन बेडच्या सुविधा निर्माण केलेल्या आहेत तथापि मागणी पाहता या सुविधा अपुऱ्या पडत आहेत. लोकांना सातारा, सांगली, पुणे, बारामती याठिकाणी आम्ही बेड उपलब्ध करून देत आहोत, परंतु त्याही ठिकाणी संसर्गाचे प्रमाण जास्त असल्याने बेड अपुरे पडत आहेत. त्यामुळे माण आणि खटावमध्ये ड्रीम सोशल फौंडेशनच्या प्रमुख अनुराधा देशमुख आणि मुकुल माधव फौंडेशनच्या प्रमुख रितू छाब्रिया यांच्या मदतीने व सहकार्याने सुसज्ज असे ऑक्सिजन बेड असलेले कोव्हीड सेंटर उभे करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे अत्यावश्यक असलेली औषधे गरजू रुग्णांना  उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती माजी विभागीय आयुक्त व खटाव माण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख यांनी दिली.
​कोरोनाच्या दुसरे लाटेने माण व खटाव मध्ये भीषण स्वरूप धारण केलेले आहे. अनेक लोकांना उपचार करूनही आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामध्ये तरुणांनाही मोठ्या प्रमाणात लागण झालेली आहे. काही जवळचे सहकाऱ्यांना कोरोनाच्या संसर्गामुळे प्रयत्न करूनही आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यांच्या अकाली जाण्याने आम्हाला खूप वेदना झाल्या आहेत. त्या बद्दल खूप दुःख वाटते.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या संसर्गामुळे घरातील प्रमुख व्यक्तीचे प्राण गमावल्याने काही कुटुंबावर मोठा आघात झालेला आहे. लोकांच्यात खूप भीतीचे वातावरण आहे, परंतु आपण सर्वांनी त्या भीतीवर एकजुटीने मात करण्याची आवश्यकता आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणे दिसत आहेत त्यांनी न घाबरता लक्षणे दिसून येताच तात्काळ तपासणी करून घ्यावी व उपचार सुरु करावेत. लवकर व योग्य उपचार सुरु केल्यास कोरोनावर निश्चितपणे मात करता येते. गावागावांत प्रमुख व्यक्तींनी कोरोना संसर्ग तपासणीची मोहीम तीव्र करावी. ज्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात लागण झालेली आहे त्या गावांमध्ये विलगीकरण कक्ष सुरु करून औषधोपचार सुरु करून देण्याबाबत ग्रामपंचायतींनी कार्यवाही करावी.
आपण सर्वानी या अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये लोकांच्या मागे ठामपणे उभे राहून त्यांना मदत करून कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सर्वानी एकमेकांना सहकार्याची भूमिका घ्यावी असे आवाहन प्रभाकर देशमुख यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

चैतन्य अकँडमीतली शिस्त विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतेय...!- सौ.सोनियाताई गोरे ; दहिवडीत चैतन्य माणदेश पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न

छोटूकाकांच्या आध्यात्मिक कार्याच्या पाठीशी कायम....... ! - सौ.सोनियाताई गोरे ; छोटूकाका कुलकर्णी चैतन्य माणदेश पुरस्काराने सन्मानित

...79 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दादांची 45 वर्षांची अखंडीत पत्रकारिता...!