दिवड येथे कृषीदूताकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन..!


बिजवडी - महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कराडच्या शासकीय कृषी महाविद्यालयाचा कृषिदूत अजिंक्य अरुण पाटोळे याने ग्रामीण कृषी जागरुकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत माण तालुक्यातील दिवड येथे थ्रिप्स नियंत्रण कसे करावे याविषयी माहिती दिली. त्यामध्ये त्यांनी नैसर्गिक रित्या ब्ल्यू स्टिकी ट्रॅप वापरावे आणि ते कसे लावावे याचे ही कृषिदुताने शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले.रासायनिक  रित्या थ्रिप्स नियंत्रण कसे करावे याचे प्रात्यक्षिक करून दाखवले त्यामध्ये त्यांनी इमाडीक्लोप्रिड हा रासायनिक पदार्थ वापरला. रासायनिक द्रावण कसे तयार करावे व ते किती प्रमाणात घ्यावे याचीही माहिती शेतकऱ्यांना दिली.
 कृषी दूताने शेतकऱ्यांना तणांचे व्यवस्थापन कसे करावे याचे प्रात्यक्षिक करून दाखवले व त्याचे फायदे  ही शेतकऱ्यांना सांगितले.तणांचे व्यवस्थापन न केल्यास त्याचा  मुख्य पिकावर काय परिणाम होतो याची माहिती दिली. कृषी दूताने शेतकऱ्यांना कृषी दर्शनी  वापरण्याचा सल्ला दिला.
  कृषिदूताने ही अनमोल माहिती दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी त्याचे कौतुक केले व विद्यापिठाला असेच उपक्रम राबवण्यास प्रोत्साहन दिले.
  कृषीदुतास सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. आर. सूर्यवंशी (प्राचार्य, कृषी महाविद्यालय कराड ), कीटक शास्त्र तज्ञ डॉ. इंदिरा घोनमोडे , कार्यक्रम समन्वयक डॉ. धनंजय नावडकर, कार्यक्रम अधिकारी डॉ. राम भाऊ एच.  हंकारे, केंद्र प्रमुख डॉ. मोहन एस. शिर्के,डॉ. आनंद एम. चवई यांचे मार्गदर्शन लाभले.

फोटो - दिवड ता.माण येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषीदूत अजिंक्य पाटोळे...

Comments

Popular posts from this blog

चैतन्य अकँडमीतली शिस्त विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतेय...!- सौ.सोनियाताई गोरे ; दहिवडीत चैतन्य माणदेश पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न

छोटूकाकांच्या आध्यात्मिक कार्याच्या पाठीशी कायम....... ! - सौ.सोनियाताई गोरे ; छोटूकाका कुलकर्णी चैतन्य माणदेश पुरस्काराने सन्मानित

...79 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दादांची 45 वर्षांची अखंडीत पत्रकारिता...!