माणदेशी कन्येने गौरीपूजनाला उभारला टोकियो ऑलिंम्पिकमधील यशस्वी महिलांचा प्रतिकात्मतक रूपांचा देखावा...!

गौरीपूजनाला उभारला टोकियो ऑलम्पिक मधील महिलांच्या
प्रतिकात्मक रूपांचा देखावा..!
माणदेशी कन्येचा सासुरवाडीत सामाजिक उपक्रम,दि.१७ :माण रत्नांची खाण म्हणून ओळखली जाते.माणदेशाच्या या मातीतून प्रशासकीय ,क्रिडा ,सामाजिक , राजकीय क्षेत्रात अनेकांनी उल्लेखनीय कार्य करून आपल्या माणचे नाव देशभरात गाजवले आहे.टाकेवाडी ता.माण येथील सुकन्येनेही आपल्या सासुरवाडीत बारामती (काटेवाडी) याठिकाणी गौरीपूजनाला नुकत्याच झालेल्या टोकियो ऑलिंम्पिकमध्ये उज्वल यश मिळवलेल्या भारतीय महिलांचा प्रतिकात्मक रूपांचा देखावा सादर केला होता.या देखाव्याची चर्चा राज्यभर झाली असून माणदेशी कन्येच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
 टाकेवाडी ता.माण येथील माणदेशी सुकन्या कमल जगन्नाथ सावंत यांना बारामती येथे भापकर कुटुंबात दिले असून पहिल्यापासून विविध उपक्रम राबवण्याची आवड असलेल्या सौ.कोमल यांनी गेल्यावर्षीही गौरीपूजनाला कोरोना काळात डॉक्टर ,नर्स रूग्णांची सेवा करतानाचा देखावा सादर केला होता.या देखाव्याचेही मोठे कौतुक झाले होते.तर यावर्षी त्यांनी टोकियो ऑलिंम्पिकमध्ये वेटलिफ्टिंग मधील मीराबाई चानू आणि बँडमिंटन मधील पी.व्ही.सिंधू या महिलांनी उत्तम कामगिरी करत भारताचे
नाव उज्वल केल्यामुळे त्यांच्या या
कामगिरीचे कौतुक करण्यासाठी गौरीपूजनाला या दोघींच्या प्रतिकात्मक रूपांचा देखावा सादर केला होता.
 बारामती काटेवाडी येथे सौ.कमल अविनाश भापकर यांनी त्यांच्या प्रतिकात्मक रुपांची सजावट करून गौरी
पूजन केले आहे.त्या शरयू फौंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांच्या सामाजिक विचारांचा वारसा घेऊन गेले पंधरा वर्षे विविध विषयांवर गौरीची सजावट
करत आहेत.त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

फोटो - माणदेशी सुकन्या सौ.कमल भापकर यांनी सासुरवाडीत गौरीपूजनाला उभारलेला ऑलिम्पिंकमधील यशस्वी महिलांचा प्रतिकात्मक रूपांचा देखावा...

Comments

Popular posts from this blog

चैतन्य अकँडमीतली शिस्त विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतेय...!- सौ.सोनियाताई गोरे ; दहिवडीत चैतन्य माणदेश पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न

छोटूकाकांच्या आध्यात्मिक कार्याच्या पाठीशी कायम....... ! - सौ.सोनियाताई गोरे ; छोटूकाका कुलकर्णी चैतन्य माणदेश पुरस्काराने सन्मानित

...79 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दादांची 45 वर्षांची अखंडीत पत्रकारिता...!