सुचिता माळवे माण तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
बिजवडी - सातारा जिल्ह्यातील माण पंचायत समिती तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाचा सोहळा महाराष्ट्र राज्याचे माजी पशुसंवर्धन दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय खात्याचे कॅबिनेट मंत्री आणि विद्यमान विधानपरिषद सदस्य मा.महादेव जानकर यांचे अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सदस्य मा. प्रभाकरजी देशमुख ,सातारा जिल्हा शिक्षण अर्थ व क्रीडा समितीचे सभापती मा.मानसिंगराव जगदाळे.विद्यमान जिल्हा शिक्षण,अर्थ व क्रीडा समिती व जि.प.सदस्य मा.अरुण गोरे,जि प.सदस्या मा.सुवर्णाताई देसाई,जि.प.सदस्य मा.बाबासो पवार,सातारा जि.प.प्राथमिक शिक्षणाधिकारी मा.धनंजय चोपडे, प. स.माणच्या सभापती मा.लतिका विरकर,उप सभापती मा.पै.नितीन राजगे, गटविकासाधिकारी मा.सर्जेराव पाटील,माजी सभापती मा.रमेश पाटोळे व मा.कविता जगदाळे,विद्यमान प.स सदस्य मा.विजयकुमार मगर,मा रंजनाताई जगदाळे,मा.अपर्णा भोसले,मा.चंद्रभागा आटपाडकर, सहाय्यक गटविकासाधिकारी व गट शिक्षणाधिकारी मा.नरेंद्र मेडेवार ,भाग शिक्षणविस्ताराधिकारी मा.संगीता गायकवाड व मा.सोनाली विभूते आणि केंद्र प्रमुख मा नारायण आवळे या सर्वांच्या साक्षीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोधवडेच्या गुणवान व उपक्रमशील उपशिक्षिका मा.सुचिता माळवे यांना शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह,ग्रंथ व प्रमाणपत्र देऊन माण तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे सध्या त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. यात प्रामुख्याने लोधवडेचे सरपंच ,उपसरपंच व सर्व ग्रा.सदस्य आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य,मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकवृंद तसेच बहुसंख्य पालकवर्ग व ग्रामस्थ यांनी त्यांचे अभिनंदन केले.
Comments
Post a Comment