जिल्हा बँकेत माणमधून चांगला माणूस पाठवा...!- ना.रामराजे ना.निंबाळकर ;
बिजवडी -जिल्हा बँकेची निवडणूक लागतेय.बँकेत चुकीच्या माणसाला निवडून दिलं की त्याचा त्रास बँकेबरोबरच आम्हाला सहन करावा लागतोय.चुकीच्या माणसामुळे राज्यात आदर्शवत असलेल्या जिल्हा बँकेचे नाव खराब होेतेय.त्यामुळे मी आपणा सर्वांना एकच विनंती करतोय की निदान यावेळी तरी माणमधून चांगला माणूस संचालक म्हणून निवडून द्या...असा उपरोधीक टोला विधानपरिषदेचे सभापती ना.रामराजे ना.निंबाळकर यांनी नाव न घेता आमदार जयकुमार गोरेंना दिला आहे.
निमित्त होतं.... ते दहिवडी ता.माण येथील एका कार्यक्रमाचे....या कार्यक्रमात त्यांनी जिल्हा बँकेच्या निवडणूकीचा विषय काढला होता.
यावेळी बोलताना रामराजे ना.निंबाळकर म्हणाले ,काहीजणांचा मुक्काम दिल्लीत अमित शहा व मुंबईच्या ईडीच्या कार्यालयात दिसून येतोय.ईडीकडे तक्रारी केल्या जात आहेत.आपली जिल्हा बँक एक नंबरची बँक आहे.कोणीही काही चुकीचे प्रकार केले तरी बँक कधीच अडचणीत येणार नाही.अशा लोकांच्याविषयी बोलणारा फक्त मीच आहे.त्यांच काय करायच ते आमदारकीच्या वेळेस पाहूच असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
पण निदान त्यावेळी ठरवताना मला बोलवा ...असा सूचक टोलाही त्यांनी माणमधील आपल्या पक्षातील लोकांना लगावला.
Comments
Post a Comment