वाघजाई देवराईत ऑक्सिजन पार्क निर्मिती साठी वृक्षारोपण...!

बिजवडी - मौजे धामणी ता.माण येथील वाघजाई देवी ही परिसरातील अनेक गावांमध्ये जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.मंदिर परिसरात पर्यावरण मित्र व बहुउद्देशीय संस्था भारत, पानी फाऊंडेशन,सह्याद्री देवराई,सामाजिक वनीकरण ,ग्रामपंचायत धामणी आणि युवा मंडळे या सर्वांच्या माध्यमातून वाघजाई देवी मंदिर परिसराचे सुशोभीकरण आणि इको.ऑक्सिजन पार्क निर्मितीचे कार्य हाती घेण्यात आले आहे.त्याचाच एक भाग म्हणून कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून वाघजाई देवी मंदिर परिसरात शेकडो वृक्षांचे नियोजनपूर्वक वृक्षारोपण करण्यात आले.
या मंदिराचा निसर्गरम्य परिसर भाविकांच्या मनाला शांतता आणि समाधान मिळवून देतो.या देवीच्या मंदिराचे बांधकाम तोडीव दगडात रेखीवपणे केले आहे.मंदिरातील प्रसन्न भाव मुद्रा असलेली वाघजाई देवीची मूर्ती अनेकांच्या चेहऱ्यावर सात्विक समाधान निर्माण करते.मंदिराच्या जवळच पाण्याचा तलाव आहे.पिंपरण आणि आम्र वृक्षांच्या गर्द सावलीतील ह्या मंदिर परिसरात थकल्या भागल्या मनाला क्षणभराचा विसावा मिळतो.मंदिरासमोर मोठा आर सी सी मंडप आहे.त्यात सुंदर असे सुविचार लेखन केले आहे.वृक्षांना व इतर पाणी व्यवस्थेकरिता सदाशिव महादेव खाडे यांनी स्वखर्चाने मोठी सिमेंट काँक्रीटची गोलाकार टाकी बांधली आहे.त्यामुळे चोवीस तास मुबलक पाण्याची सुविधा निर्माण झाली आहे.पशु वैद्यकीय डॉ.पांडुरंग काटकर यांनी अक्वा शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.धामणी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रकाशमान अशी विद्युत सुविधा केली आहे.विनायक खाडे यांनी टी व्ही ची सोय करून दिली आहे.
 पर्यावरण व वृक्ष प्रेमी मित्र सतेशकुमार माळवे, प्रकाश खाडे, अँड.चंद्रकांत नाकाडे,अजित खाडे, विजय खाडे,सुधाकर नाकाडे,वैभव खाडे, नाथा खाडे, निलेश खाडे,रवि जाधव, तुषार खाडे,सागर सानप,तुषार नागरगोजे,सागर नाकाडे, श्रीरंग खाडे,केतन नाकाडे,वैभव जाधव,विलास खाडे, नाथा सानप,पुजारी सुखदेव केंगार आदि ही सर्व मंडळी त्यासाठी रात्रंदिवस झटून भरपूर मेहनत घेत आहेत.झाडे आणि इतर प्रकारच्या सुरक्षिततेकरिता तारेच्या कुंपणाचे ही नियोजन करण्यात आले आहे.
  वाघजाई देवराईच्या सुशोभिकरण व ऑक्सिजन पार्क निर्मिती उपक्रम, संकल्पना,नियोजनआणि त्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या कृतीचे पुण्याच्या भूमीसंपादन अधिकारी सुरेखा माने, पर्यावरण मित्र आणि बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष देवा तांबे,सह्याद्री देवराईचे संस्थापक-सयाजी शिंदे,पानी फाऊंडेशनचे समनवयक अजित पवार , सामाजिक वनीकरण विभागाचे  प्रशासकीय अधिकारी वर्ग, बहुसंख्य ग्रामस्थ वर्ग,भाविक भक्त आणि पर्यावरण प्रेमी मंडळींच्याकडून मोठया प्रमाणावर कौतुक होत आहे.

फोटो - धामणी ता.माण येथे वृक्षारोपण करताना वृक्षप्रेमी

Comments

Popular posts from this blog

चैतन्य अकँडमीतली शिस्त विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतेय...!- सौ.सोनियाताई गोरे ; दहिवडीत चैतन्य माणदेश पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न

छोटूकाकांच्या आध्यात्मिक कार्याच्या पाठीशी कायम....... ! - सौ.सोनियाताई गोरे ; छोटूकाका कुलकर्णी चैतन्य माणदेश पुरस्काराने सन्मानित

...79 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दादांची 45 वर्षांची अखंडीत पत्रकारिता...!