चोरी प्रकरणातील ५ वर्षे फरार आरोपीस अटक..!दहिवडी पोलीसांची कामगिरी
बिजवडी - मौजे किरकसाल ता.माण येथील चोरी प्रकरणातील पाच वर्षे फरार असलेल्या आरोपीस ताब्यात घेतल्याची माहिती दहिवडी पोलीस स्टेशनचे सपोनि संतोष तासगावकर यांनी दिली.
मौजे किरकसाल ता.माण येथील एकनाथ महादेव अवघडे यांचे बंद घराचे कुलूप तोडुन अज्ञात इसमाने त्यांचे घरात ठेवलेली बजाज प्लॅटीना मोटार सायकल क्रमांक एम.एच ११.ऐ.एन.६९७७ हि दुचाकी चोरीस गेली होती. दहिवडी पोलीस स्टेशनला अज्ञात इसमाविरुध्द
गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे तपासांत गुन्हयातील चोरीस गेलेली मोटार सायकल हि नितिन प्रकाश तुपे रा.आगाशिवनगर कराड ता. कराड याचे ताब्यात दिनांक २१/१२/२०१६ रोजी मिळुन आलेने त्यास सदर गुन्हयाचे
कामी यापुर्वी अटक करण्यात आली होती.सदर गुन्हयाचे तपासांत मारुती शामराव तुपे रा.आगाशिवनगर
कराड ता.कराड जि.सातारा हा निष्पन्न झाला होता. व तो गुन्हा घडलेपासुन फरारी होता.दिनांक १९/१०/२०२१ रोजी दहिवडी पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील फरारी आरोपी मारुती शामराव तुपे हा किरकसाल ता.माण जि.सातारा या गांवी येणार असलेची माहिती मिळाल्याने त्यास किरकसाल ता.माण गांवी' सापळा रचुन शिताफीन ताब्यात घेवुन
गुन्हयाचेकामी अटक करण्यात आली.त्यास मा.न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन
कोठडी मिळाली आहे.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक अजित बो-हाडे ,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.श्री.निलेश देशमुख दहिवडी यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर सहायक पोलीस
फौजदार पी.जी.हांगे ,पोलीस एस.एन.केंगले , आर.एस.बनसोडे ,कदम
यांनी केली आहे.
Comments
Post a Comment