माझा गड माझा अभिमानातंर्गत वारूगडला भव्य किल्ले प्रतिकृती बांधणी स्पर्धा..!
बालमनाला किल्ले संवर्धन, किल्ले स्वच्छता आणि किल्ल्याचे महत्व पटावं म्हणून किल्ले वारूगड ता.माण येथे दुर्गप्रेमींकडून दिपावलीचे औचित्य साधत दि.३० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत भव्य किल्ले प्रतिकृती बांधणी स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती संयोजकाच्यावतीने देण्यात आली आहे.
या स्पर्धेत इयत्ता अंगणवाडी ते चौथी ,इयत्ता पाचवी ते आठवी ,इयत्ता ९ वी पुढे वय मर्यादा नाही असे तीन गट पाडण्यात आले आहेत.स्पर्धेत प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार असून विजेत्यांना प्रत्येक गटात प्रथम तीन क्रमांकाना आकर्षक बक्षीस , सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी इच्छुकांनी आपले नाव , वय ,इयत्ता , पत्ता , शाळेचे नाव , संपर्क क्रमांक व आपण बनवलेल्या किल्ल्यांचे पाच फोटो व्हॉटसपवर स्पर्धा कालावधीत पाठवावेत. किल्ल्यांचे चार फोटो हे चार वेगवेगळ्या दिशांनी व किल्ल्याचा एक फोटो स्पर्धकासोबत असावा.
आपल्या किल्ल्याचे फोटो व माहिती कल्याण फडतरे-9930955994 , महादेव क्षीरसागर 9773445054 , निलेश पवार-9545464195 , प्रा. दत्तात्रय भापकर -9172131536 , डाॅ.लक्ष्मण खांडे -7718907671
यापैकी कोणत्याही एका वॉट्सअप क्रमांकावर पाठवावी असे आवाहनही संयोजकाच्यावतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment