दहिवडीत गुटखा प्रकरणी दहिवडी पोलीसांची कारवाई...!
बिजवडी - दहिवडी ता.माण येथे पोलीस स्टेशनने दहिवडीत एक लाख ५६ हजार रूपयांचा गुटखा जप्त केला असून या प्रकरणी सुखदेव राजू शिंदे यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती सपोनि संतोष तासगावकर यांनी दिली.
गोपनिय माहीतीचे आधारे दहिवडी
पोलीसांनी शिंदे मळा दहिवडी ता.माण येथे सुखदेव राजु शिंदे यांचे पत्र्याचे शेडमध्ये छापा टाकुन केशरयुक्त पान मसाला व तंबाखूचे सहा पोती अंदाजे १ लाख ५६ हजार रूपये किंमतीचा गुटखा हस्तगत केला आहे.
सदर प्रकरणी श्रीमती अस्मिता गायकवाड अन्न सुरक्षा अधिकारी ,अन्न औषध प्रशासन विभाग
सातारा यांनी तक्रार दिली आहे.त्यानुसार संबंधितावर दहिवडी पोलीस स्टेशनला गु.र.न. ३०३/२०२१ अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ चे कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल , अप्पर पोलीस अधिक्षक अजित बो-हाडे ,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर ,पी. जी. हांगे ,एस.एन.केंगले ,आर.एस.बनसोडे यांनी केली आहे.
Comments
Post a Comment