एन .एच .जाधव यांचे शैक्षणिक कार्य आदर्शवत...! -प्राचार्य आर .डी. गायकवाड

बिजवडी - पाडळी (निनाम )ता.सातारा येथील इंग्लिश स्कुल व स्व.तानाजी बंडू ढाणे ज्यु .कॉलेजचे प्राचार्य नंदकुमार हरिश्‍चंद्र जाधव यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान आदर्शवत असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य प्राचार्य आर.डी.गायकवाड यांनी केले. 
 पाडळी (निनाम) ता.सातारा येथे सौदागर मंगल कार्यालयात सेवानिवृत्ती कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते.विभागीय अधिकारी आर.एस साळुंखे ,पोपटराव काटकर , अध्यक्ष बी.जे दळवी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला .
 गायकवाड म्हणाले ,जाधव सरांचे शैक्षणिक सेवेसाठी त्यागमय जीवन जगत रयत शिक्षण संस्थेची सेवा केली आहे.त्यांचे सेवानिवृत्तीनंतरचे जीवन आनंदी व निरोगी राहावे अशी आशाही व्यक्त केली.
सत्कारमूर्ती जाधव म्हणाले , माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनातून रयत शिक्षण संस्था वजा केली तर मागे काहीच शिल्लक राहणार नाही.संस्थेचे स्थान आपल्या हृदयात कायम राहील अशी कृतज्ञता व्यक्त केली .कार्यक्रमाच्या निमित्ताने उभयतांचा सत्कार शाखेच्या वतीने करण्यात आला . कार्यक्रमाप्रसंगी कुटुंबीय , आप्तेष्ट,स्कूल कमिटी सदस्य ,शाखेतील विविध कमिट्यांचे सदस्य ,निनाम व पाडळी गावचे सरपंच - उपसरपंच , ग्रामस्थ ,पालक ,विद्यार्थी ,विविध शाखेतील रयतसेवक बहुसंख्येने उपस्थित होते.
 प्रास्ताविक शामराव गायकवाड यांनी केले.सूत्रसंचालन आर.डी.ढाणे व सौ. निता पाटील यांनी केले .आभार संतोष ढाणे यांनी मानले.

फोटो - पाडळी (निनाम) ता.सातारा येथे सेवानिवृत्ती निमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार स्विकारताना प्राचार्य जाधव...

Comments

Popular posts from this blog

चैतन्य अकँडमीतली शिस्त विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतेय...!- सौ.सोनियाताई गोरे ; दहिवडीत चैतन्य माणदेश पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न

छोटूकाकांच्या आध्यात्मिक कार्याच्या पाठीशी कायम....... ! - सौ.सोनियाताई गोरे ; छोटूकाका कुलकर्णी चैतन्य माणदेश पुरस्काराने सन्मानित

...79 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दादांची 45 वर्षांची अखंडीत पत्रकारिता...!