सेपक टकरा स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी कु.अपेक्षा दडस हिची निवड..!
सेपक टकरा स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी कु.अपेक्षा दडस हिची निवड..!
बिजवडी - गोवा येथे 37 व्या राष्ट्रीय सेपक टकरा या स्पर्धेसाठी महिला संघाच्या कर्णधार पदी कु.अपेक्षा अनिल दडस हिची निवड झाली आहे.
ही स्पर्धा 30 ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर पर्यंत होणार आहेत राष्ट्रीय खेळासाठीचे सराव शिबिर नागपूर येथे नुकतेच दिनांक 3 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर या कालावधीत संपन्न झाले.यामधूनच महाराष्ट्र संघाची निवड करण्यात आली. गोवा येथे विविध स्पर्धेचे राष्ट्रीय स्तरावर नियोजन करण्यात आलेले आहे त्यामध्ये सेपक टकरा या महिला संघाचे नेतृत्व पांगरी गावची कन्या अपेक्षा अनिल दडस ही करणार असून या संघामध्ये नाशिकची मधुरा टेपाळे आणि नागपूरची चेतना शेंगला यांची देखील निवड करण्यात आलेली आहे.
कु.अपेक्षा दडस हिच्या निवडीबद्दल तीचे आ. जयकुमार गोरे ,प्रभाकर देशमुख, अनिल देसाई ,प्राचार्य साळुंखे ,चंद्रकांत भोईटे ,अर्जुन काळे आदी मान्यवरांनी अभिनंदन करून गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
कु.अपेक्षा दडस
Comments
Post a Comment