साईराज साळुंखे याचे बुध्दीबळ स्पर्धेत यश..!

बिजवडी,ता.27: वडूज ता.खटाव येथील त्रिनिटी इंटरनॅशनल स्कूलमधील साईराज साळुंखे याने खटाव तालुकास्तरीय बुध्दीबळ स्पर्धेत 14 वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक मिळविला आहे.त्याची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
 शहाजीराजे महाविद्यालय खटाव येथे या स्पर्धा संपन्न झाल्या.साईराज साळुंखे याला शाळेचे क्रीडाशिक्षक रियाज आतार यांचे मार्गदर्शन मिळाले.
या यशाबद्दल साईराज साळुंखे याचे शाळेच्या संचालिका सौ.हर्षदा देशमुख-जाधव, मुख्याध्यापिका सौ.मृदुला बॅनर्जी, शाळेचे व्यवस्थापक सुरज भोसले,  महेश मममदापुरे व सर्व शिक्षक ,कर्मचारी वर्ग,विद्यार्था यांनी अभिनंदन केले.

फोटो - वडूज ता.खटाव येथील तालुकास्तरीय बुध्दीबळ स्पर्धेत यश मिळवल्यानंतर साईराज साळुंखे याचा सत्कार करताना मान्यवर

Comments

Popular posts from this blog

चैतन्य अकँडमीतली शिस्त विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतेय...!- सौ.सोनियाताई गोरे ; दहिवडीत चैतन्य माणदेश पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न

छोटूकाकांच्या आध्यात्मिक कार्याच्या पाठीशी कायम....... ! - सौ.सोनियाताई गोरे ; छोटूकाका कुलकर्णी चैतन्य माणदेश पुरस्काराने सन्मानित

...79 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दादांची 45 वर्षांची अखंडीत पत्रकारिता...!