दहिवडी येथील रयत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न..!


बिजवडी : दहिवडी ता.माण येथील रयत इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट अबू शाखा दहिवडी यांच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न झाला.
 याप्रसंगी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या आदरणीय प्रियांका बहनजी व आदरणीय उषा बहन जी यांनी सर्व शिक्षिका व शिक्षकांना राखी बांधून रक्षाबंधनाचे महत्त्व समजावून सांगितले
याप्रसंगी मुख्याध्यापिका सौ.भारती प्रदीप जाधव उपस्थित होत्या .त्यांनाही आदरणीय प्रियांका बहन जी यांनी राखी बांधली.
 मुख्याध्यापिका सौ.भारती जाधव यांनी शाळेत राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती आदरणीय बहनजी यांना दिली.
 खिलारे सर यांनी प्रास्ताविक करून सर्वांचे आभार मानले.व अतिशय उत्साही वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.

फोटो - दहिवडी ता.माण येथे रयत इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये रक्षाबंधन कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवर व शिक्षकवर्ग...

Comments

Popular posts from this blog

चैतन्य अकँडमीतली शिस्त विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतेय...!- सौ.सोनियाताई गोरे ; दहिवडीत चैतन्य माणदेश पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न

छोटूकाकांच्या आध्यात्मिक कार्याच्या पाठीशी कायम....... ! - सौ.सोनियाताई गोरे ; छोटूकाका कुलकर्णी चैतन्य माणदेश पुरस्काराने सन्मानित

...79 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दादांची 45 वर्षांची अखंडीत पत्रकारिता...!