साखरवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विक्रम ढेंबरे यांची बिनविरोध निवड...!

विशाल गुंजवटे :
बिजवडी - साखरवाडी ता.फलटण येथील ग्रामपंचायतीच्या नूतन उपसरपंचपदी विक्रम बबनराव ढेंबरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
 साखरवाडी ता.फलटण येथील ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती.या निवडणूकीत राजे गट विरूध्द विक्रम भोसले अशी लढत दिसून आली.या निवडणूकीत किंगमेकरची भूमिका बजावत विक्रम भोसले यांनी आपल्या कल्पक नेतृत्वाच्या जोरावर व जनतेच्या आशीर्वादावर राजे गटाच्या विरोधात एकतर्फी खिंड लढवली.यात ऐतिहासिक विजय मिळवत ग्रामपंचायत ताब्यात घेत असताना किंगमेकर विक्रम भोसले यांना त्यांचे सहकारी विक्रम ढेंबरे खंबीरपणे पाठीशी उभे राहत निस्वार्थीपणे मोलाची साथ दिली.त्यांच्यासह इतर सहकाऱ्यांच्या साथीमुळेच विक्रम भोसले ग्रामपंचायतीत किंगमेकर बनू शकले.
 त्यावेळी सरपंचपदी सौ.रेखा संजय जाधव यांची निवड झाली होती.तर उपसरपंचपदी अक्षय रूपनवर यांची निवड करण्यात आली होती.त्यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते.रिक्त असलेल्या उपसरपंच पदाची निवडीची प्रक्रिया नुकतीच ग्रामपंचायतच्या सरपंच सौ रेखा संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
 रिक्त असलेल्या उपसरपंच पदासाठी खंबीरपणे साथ देणाऱ्या विक्रम ढेंबरे यांनाच संधी द्यायची हे सर्वानुमते ठरले होते.त्यामुळे त्यांचाच एकमेव अर्ज दाखल केल्यानंतर त्यांची उपसरपंच पदावर बिनविरोध निवड करण्यात आली.
 या निवडीनंतर ग्रामपंचायतीचे किंगमेकर विक्रम भोसले यांनी आपले सहकारी व नूतन उपसरपंच विक्रम ढेंबरे यांना फेटा बांधून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ग्रामपंचायतीपुढे फटाक्यांची आतषबाजी व गुलालाच्या उधळणीत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.
 नूतन उपसरपंच विक्रम ढेंबरे यांचे माजी खा.रणजितसिंह ना.निंबाळकर,जेष्ठ नेते प्रल्हादराव पाटील,विक्रम भोसले,सरपंच रेखा जाधव,सुरेश पवार,संभाजी जाधव,सुरेश भोसले,सागर कांबळे,निलेश भोसले,अजित भोसले,राजू गाडे,संदीप जाधव,आबा मोहिते, बंडू लोखंडे, विजयसिंह मोहिते,रवि पवार,विनायक भोसले,दादा मोहिते,दादा शिंदे ,रमेश राऊत आदी प्रमुख मान्यवर ,विविध क्षेत्रातील मान्यवर,सर्व ग्रा.पं.सदस्य, युवकवर्ग, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

चौकट - दोन विक्रमची जोडी अभेद्द....
आपल्या स्वकर्तृत्वामुळे जनतेच्या हृदयात स्थान मिळवणाऱ्या विक्रम भोसले यांना विक्रम ढेंबरे यांनी खंबीरपणे साथ दिली होती.या दोन विक्रममुळे विरोधकांची राजकीय डोकेदुखी वाढली होती.ग्रामपंचायत निवडणूकी दरम्यान या दोन विक्रमची जोडी फोडली तर आपला विजय निश्चित होईल.यासाठी विरोधकांकडून ही जोडी फोडण्याचा वरिष्ठ पातळीपर्यंत प्रयत्न झाला.मात्र दिलेल्या शब्दाला जागणाऱ्या विक्रम ढेंबरे यांनी कोणत्याही अमिषांना बळी न पडता विक्रम भोसलेंना निस्वार्थीपणे साथ दिली.विश्वास,प्रेम अन आदर यामुळे या दोन्ही विक्रमची जोडी आजही अभेद्द राहीली आहे.आज विक्रम ढेंबरे यांच्या गळ्यात उपसरपंच पदाची माळ पडल्यानंतर त्यांच्या निस्वार्थी कार्याची व खंबीर साथीची पोचपावती मिळाल्याचे दिसून आले. 

चौकट - जनतेचा व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा विश्वास सार्थकी लावणार....
 साखरवाडी गावचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी जनतेने आमच्या पँनेलवर विश्वास ठेवला होता.विक्रम भोसलेंच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण ते काम करत आहोत.नुकतीच आपल्याकडे उपसरपंच पदाची जबाबदारी दिली असून ती जबाबदारी यशस्वीपणे पेलत जनतेचा व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा विश्वास निश्चितच सार्थकी लावू.
- विक्रम ढेंबरे ,उपसरपंच साखरवाडी ता.फलटण
 
फोटो - साखरवाडी ता.फलटण येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विक्रम ढेंबरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्यानंतर जल्लोष करताना कार्यकर्ते....

Comments

Popular posts from this blog

चैतन्य अकँडमीतली शिस्त विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतेय...!- सौ.सोनियाताई गोरे ; दहिवडीत चैतन्य माणदेश पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न

छोटूकाकांच्या आध्यात्मिक कार्याच्या पाठीशी कायम....... ! - सौ.सोनियाताई गोरे ; छोटूकाका कुलकर्णी चैतन्य माणदेश पुरस्काराने सन्मानित

...79 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दादांची 45 वर्षांची अखंडीत पत्रकारिता...!