रयत इंग्लिश मीडियम स्कूल दहिवडीत स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न.
बिजवडी - रयत इंग्लिश मीडियम स्कूल, दहिवडी येथे अतिशय उत्साही वातावरणात 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
मुख्याध्यापिका सौ.भारती प्रदीप जाधव यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.चारही हाऊसचे विद्यार्थी तसेच स्काऊट गाईडचे विद्यार्थी व नर्सरी ते सिनियर के.जी.बनी ग्रुप यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने संचलन केले. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी झांज पथकाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. झांज पथकाच्या प्रदर्शनासाठी प्रशालेतील क्रीडा शिक्षक प्रशांत राऊत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.अतिशय सुंदर अशा पद्धतीने झांज पथकास नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य इम्तियाज नदाफ यांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या क्रांतिकारकांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान मुलांना समजावून सांगितले. व स्वातंत्र्यानंतर देशासाठी आपण काय केले पाहिजे हेही विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
मुख्याध्यापिका जाधव मॅडम यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या भविष्यकालीन योजना बद्दलची माहिती पालकांना व नागरिकांना दिली तसेच स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना किती कष्ट घ्यावे लागले हेही विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
यावेळा माधव भोंडवे,नंदकुमार खोत,वैभव गुरसाळकर, पुरोहित साहेब यांनी विद्यार्थ्यांना खाऊवाटप केला.याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य इम्तियाज नदाफ, माधव भोंडवे सौ.हेमा मोरे तसेच मुख्याध्यापिका जाधव ,सर्व शिक्षक,विद्यार्थी ,पालकवर्ग उपस्थित होते.
खिलारे सर यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment