*रोटरी क्लब व स्लिपिंग चिल्ड्रन अराऊंड द वर्ल्डतर्फे विद्यार्थ्यांना स्लिपिंग व स्कूल किटचे वितरण...! 5 हजार विद्यार्थ्यांना 3 कोटी रूपयांचे किट ; विद्यार्थी व पालकवर्गातून समाधान व्यक्त

पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे कॅन्टोन्मेंट व स्लिपींग चिल्ड्रन अराऊंड द वर्ल्ड ( SCAW of Canada ) या स्वयंसेवी संस्थामार्फत दि.5 ते 14 फेब्रुवारी या कालावधीत वाई,दौंड,आंबेगाव, जुन्नर, इंदापूर,खेड,भोर तालुक्यातील 5 हजार विद्यार्थ्यांना 3 कोटी रूपये किंमतीचे स्लिपिंग व स्कूल किट साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.
   रोटरी क्लब ऑफ पुणे कॅन्टोन्मेंट व स्लिपींग चिल्ड्रन अराऊंड द वर्ल्ड ( SCAW of Canada ) या स्वयंसेवी संस्थामार्फत आयोजित कार्यक्रमात कॅनडा येथील स्कॉ (SCAW) टीमचे हेलेन स्कट,जेफ मँकडोगल,काथे वारे,इलियन क्राईक्स तसेच रोटरी क्लब ऑफ पुणे कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष तौहिद कॉन्ट्रॅक्टर,पंकज आपटे,समीर रुपानी, परवेझ बिलीमोरीया,रोटरी & स्कॉ कॅनडाचे मुख्य कार्यक्रम समन्वयक वैभव पोरे,रोटरी क्लब ऑफ पुणे कॅन्टोन्मेंटचे व रोटरी क्लब ऑफ पुणा नॉर्थ,व रोटरी क्लब ऑफ निगडी चे सदस्य आदी मान्यवरांच्या शुभहस्ते सात तालुक्यातील 5 हजार विद्यार्थ्यांना किट साहित्य वाटप करण्यात आले.
 शालेय विद्यार्थ्यांची झोप आनंददायी व्हावी तसेच त्यांचे शिक्षण चांगले व्हावे यासाठी या किटमध्ये चटई ,सतरंजी,बेडशीट, उशी,उशीकव्हर ,सोलापूरी चादर ,रग ,पोलर ब्लँकेट,मच्छरदाणी,शूज -सॉक्स,स्वेटर ( हुडी ),स्पोर्ट ड्रेस ,नाईट ड्रेस , रूमाल,थर्मल वॉटर बोटल,नेलकटर,टॉवेल , अंडरवेअर -बनियन,रेनकोट,स्कूल बॅग,योगा मॅट , स्टेशनरी साहित्य अशा ४६ वस्तू असणारे स्लिपींग व स्कूल कीटचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले आहे .
 या उपक्रमातंर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांची एच व्ही देसाई नेत्ररुग्णालय पुणे यांचे वतीने नेत्र तपासणी करण्यात आली.यात गरजू मुलांना मोफत चष्मे देण्यात येणार असून ज्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे अशा विद्यार्थ्यांची शस्त्रक्रिया पुणे येथे मोफत करून देण्यात येणार आहेत.यावेळी आवश्यक व गरजेचे साहित्य प्राप्त झाल्याने व नेत्र तपासणी झाल्याने सर्व शालेय विद्यार्थी व पालक आनंदून गेले होते.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती व शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे .
 गोरगरीब,गरजू विद्यार्थ्यांना या किटचा चांगला वापर होणार असून हे किट दिल्याबद्दल 
रोटरी क्लब ऑफ पुणे कॅन्टोन्मेंट व स्लिपींग चिल्ड्रन अराऊंड द वर्ल्ड या स्वयंसेवी संस्था तसेच रोटरी & स्कॉ कॅनडाचे मुख्य कार्यक्रम समन्वयक वैभव पोरे यांचे सर्व पालकांनी आभार मानले आहेत.

Comments

Popular posts from this blog

चैतन्य अकँडमीतली शिस्त विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतेय...!- सौ.सोनियाताई गोरे ; दहिवडीत चैतन्य माणदेश पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न

छोटूकाकांच्या आध्यात्मिक कार्याच्या पाठीशी कायम....... ! - सौ.सोनियाताई गोरे ; छोटूकाका कुलकर्णी चैतन्य माणदेश पुरस्काराने सन्मानित

...79 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दादांची 45 वर्षांची अखंडीत पत्रकारिता...!