विद्यार्थ्यांनो...पालक-शिक्षकांच्या शैक्षणिक ऋणाची परतफेड चांगले गुण मिळवून करा...! सपोनि अक्षय सोनवणे ; बिजवडी अनु.जाती विद्यालयात एस.एस.सी शुभचिंतन कार्यक्रम संपन्न

बिजवडी - येळेवाडी - बिजवडी ता.माण आश्रमशाळेत गोरगरीब,दिनदलित,अनाथ विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण दिले जात आहे. शिक्षणाबरोबरच विविध स्पर्धातही हे विद्यार्थी आपले कौशल्यगुण दाखवत असतात. तुमच्यासारख्या वंचित मुलांना श्री गाडगे महाराज मिशनचे संचालक शिवाजीराव महानवर बापू पालकाची भूमिका बजावत सर्व सेवा सुविधा पुरवत आहेत.तुम्ही फक्त भरपूर अभ्यास करून आपले,आईवडीलाचे व शाळेेचे नाव उज्वल करा. त्यांनी तुमच्या वर केलेल्या शैक्षणिक ऋणाची परतफेड एस.एस.सी परिक्षेत चांगले गुण मिळवून करा असेही प्रतिपादन दहिवडी पोलीस स्टेशनचे सपोनि अक्षय सोनवणे यांनी केले आहे.
 बिजवडी ता.माण येथील श्री संत गाडगे महाराज अनु.जाती निवासी माध्यमिक विद्यालयात एस.एस.सी शुभचिंतन कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गाडगे महाराज मिशनचे संचालक शिवाजीराव महानवर तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा.अभय गावडे उपस्थित होते.कार्यक्रमास आण्णा जाधव,अँड.रूषीकांत भोसले,वैभव महानवर,मुख्याध्यापक एल.जी. महानवर,डी.एस.दडस,सर्व शिक्षक,पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
 सपोनि अक्षय सोनवणे म्हणाले,तुमच्या विद्यालयाला अष्टपैलू मुख्याध्यापक मिळालेत. त्यांनी शाळेला चांगली आचार संहिता लावून दिली आहे.त्यामुळेच सर्व विद्यार्थ्यांकडे अष्टपैलू बनण्याचे गुण दिसून येत आहेत.आईवडीलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भरपूर अभ्यास करा.कोणत्याही प्रकारची कॉपी न करता पेपर लिहा.कारण कॉपी करताना तुम्ही सापडला तर तीव वर्षे परिक्षा नंतर देता येणार नाही असेही त्यांनी सांगितले.
  प्रा.अभय गावडे म्हणाले,गाडगे बाबांनी समाज सुधरवण्याबरोबच गोरगरीब दिनदलित अनाथांना शिक्षण मिळावे म्हणून कार्य केले.गाडगे बाबा चे सामाजिक कार्य अतुलनीय आहे.त्यांच्या त्यागावर ही संस्था उभी झाली आहे अन तोच वारसा महानवर बापू पुढे चालवत आहेत.गाडगे बाबांच्या नंतर अनाथांचे नाथ म्हणून बापू कार्य पाहत आहेत.विद्यार्थ्यांनो तुम्हाला मोठ झाल्याचे स्वप्न पाहत असलेले आई वडील तसेच तुम्हाला शैक्षणिक ज्ञान देणारे शिक्षक व तुमचा सांभाळ करणारे महानवर बापू तुमच्याकडून अपेक्षा ठेऊन आहेत.त्या पूर्ण करण्यासाठी मोठ्या आत्मविश्वासाने परिक्षांना सामोरे जावा तुम्हाला निश्चितच यश मिळेल असे आवाहनही त्यांनी केले.
 यावेळी अध्यक्षीय मनोगतात शिवाजीराव महानवर यांनी व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.माजी मुख्याध्यापक आण्णा जाधव व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक एल.जी.महानवर यांनी केले.  सूत्रसंचालन बाळासाहेब सरतापे यांनी केले तर
आभार सुरेश नाळे यांनी मानले.
फोटो - बिजवडी ता.माण येथील श्री संत गाडगे महाराज अनु.जाती विद्यालयात एस.एस.सी शुभचिंतन कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवर व विद्यार्थी

Comments

Popular posts from this blog

चैतन्य अकँडमीतली शिस्त विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतेय...!- सौ.सोनियाताई गोरे ; दहिवडीत चैतन्य माणदेश पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न

छोटूकाकांच्या आध्यात्मिक कार्याच्या पाठीशी कायम....... ! - सौ.सोनियाताई गोरे ; छोटूकाका कुलकर्णी चैतन्य माणदेश पुरस्काराने सन्मानित

...79 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दादांची 45 वर्षांची अखंडीत पत्रकारिता...!