उर्मी,दुर्गसंवर्धन व अफँनिटी एक्स ची सामाजिक बांधीलकी...! वाढाणे,भुतोंडे,कर्नावड तसेच इतर केंद्रातील विद्यार्थ्यांना 5 हजार रेनकोटचे वाटप
बिजवडी,ता.28: पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्याने शाळेत जाताना विद्यार्थी पाऊसात भिजू नयेत यासाठी उर्मी,दुर्गसंवर्धन व अफँनिटी एक्स यांच्या संयुक्त विद्दमाने सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून वाढाणे,भुतोंडे,कर्नावड तसेच इतर केंद्रातील विद्यार्थ्यांना 5 हजार रेनकोटचे वाटप करण्यात आले आहे.
वाढाणे केंद्रातील सर्व शाळांमधील विद्यार्थी ,भुतोंडे केंद्रातील ४ शाळा व कर्नावडमधील शाळेतील सर्व विद्यार्थी तसेच राधानगरी ,पाटण , जुन्नर , आंबेगाव , महाबळेश्वर या तालुक्यातील ही शाळेतील विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले आहे.या विद्यार्थ्यांना ऊर्मी ,दुर्गसंवर्धन यांच्या माध्यमातून अँफिनिटी एक्स कंपनीतर्फे आर्थिक सहयोगातून दर्जेदार रेनकोटचे वाटप करण्यात आले.
या रेनकोटला बाहेरून पॅराशुट कोटींग व आतून प्लास्टिक कोटींगचे स्कूल बॅग सह संपूर्ण संरक्षण देणारे हे रेनकोट देण्यात आले आहेत.
या रेनकोटमुळे पावसाळी वातावरणातही विद्यार्थ्यांना शाळेत येता येणार आहे.तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहून गुणवत्ता सुधारण्यासाठी हा उपक्रम निश्चीतच फायदेशीर ठरणार आहे.
यावेळी उर्मी,दुर्गसंवर्धन व अफँनिटी एक्स पदाधिकारी, अधिकारी,वैभव पोरे,सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते.
फोटो - रेनकोटचे वाटपप्रसंगी उपस्थित मान्यवर व विद्यार्थी...
Comments
Post a Comment