बिजवडी येथील श्री संत गाडगे महाराज अनु.जाती निवासी विद्यालयात प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ...! पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश घेण्याचे आवाहन

बिजवडी -शाहू ,फुले,आंबेडकर निवासी गुरुकुल महाराष्ट्र राज्य योजनेअंतर्गत बिजवडी ता.माण येथे श्री संत गाडगे महाराज अनु.जाती निवासी प्राथमिक/माध्यमिक विद्यालय अनुदान तत्वावर सुरू असून या आश्रमशाळेत इयत्ता 1 ली ते 10 वीपर्यंत अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ झाल्याची माहिती मुख्याध्यापक एल.जी.महानवर यांनी दिली आहे.
 बिजवडी अनु.जाती प्राथमिक/माध्यमिक विद्यालयात इयत्ता 1 ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वसोयीनियुक्त जेवणाची व राहण्याची उत्तम सोय केली जाणार आहे.अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.याठिकाणी इयत्ता 10 वीची 100 टक्के निकालाची परंपरा असून अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन,सर्वसोयीनुयक्त अशी सुसज्ज इमारत,भव्य क्रिडांगण,विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी,मुलींसाठी समुपदेशन,शाळाबाह्य स्पर्धा परीक्षा,शिष्यवर्ती व इतर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन,सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा,मोफत गणवेश व पाठ्यपुस्तके,इतर शालेय साहित्य,आरटीई कायद्यानुसार सर्व सोयी सुविधा,सकाळी व संध्याकाळी अभ्यासिका,कुस्ती तसेच विविध क्रिडा स्पर्धांचे मार्गदर्शन यासह यासह विविध सोयीसुविधा दिल्या जात आहेत.
 तरी गरजू,गोरगरीब,दिनदलित,अनाथ विद्यार्थ्यांना या विद्यालयात पालकांनी प्रवेश घ्यावा असे आवाहनही प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक डी.एस.दडस यांनी केले आहे.
फोटो - बिजवडी ता.माण येथील श्री संत गाडगे महाराज प्राथमिक/माध्यामिक निवासी विद्यालयाची सुसज्ज असलेली इमारत व टॉयलेट...

Comments

Popular posts from this blog

चैतन्य अकँडमीतली शिस्त विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतेय...!- सौ.सोनियाताई गोरे ; दहिवडीत चैतन्य माणदेश पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न

छोटूकाकांच्या आध्यात्मिक कार्याच्या पाठीशी कायम....... ! - सौ.सोनियाताई गोरे ; छोटूकाका कुलकर्णी चैतन्य माणदेश पुरस्काराने सन्मानित

...79 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दादांची 45 वर्षांची अखंडीत पत्रकारिता...!