स्व.लक्ष्मण कृष्णा कविटकर यांच्या स्मरणार्थ कविटकर कुटुंबियांचा दातृत्वपणा..! येळेवाडी-बिजवडी शैक्षणिक संकुलात शैक्षणिक साहित्याचे वितरण ; अन्नधान्याचीही मदत
बिजवडी, ता.29: श्री संत गाडगे महाराज शैक्षणिक संकुल येळेवाडी-बिजवडी ता.माण येथील विद्यार्थ्यांना स्व.लक्ष्मण कृष्णा कविटकर यांच्या स्मरणार्थ कविटकर कुटुंबियांच्या वतीने शैक्षणिक अन्नधान्य साहित्याचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते श्री गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.येळेवाडी -बिजवडी शैक्षणिक संकुलात गोर गरीब, दिनदलित, अनाथ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.प्रतिकूल परिस्थिती शिक्षण घेणाऱ्या या मुलामुलींच्या मदतीसाठी सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून कविटकर कुटुंबियाच्यावतीने स्व.लक्ष्मण कृष्णा कविटकर यांच्या स्मरणार्थ साहित्याचे वितरण करण्यात आले.याप्रसंगी दुर्गसंवर्धन चे संतोष जाधव ,सौ.जाधव ,श्रीमती प्रतिभा लक्ष्मण कविटकर, अमित कविटकर, रविंद्र कविटकर, सौ.विद्या कविटकर,सौ.तनुजा कविटकर, रचित कविटकर, तन्वी कविटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना साहित्य वितरण करण्यात आले.श्री गाडगे महाराज मिशनचे संचालक शिवाजीराव महानवर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
संतोष जाधव व सौ.विद्या कविटकर यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक मुख्याध्यापक एल.जी.महानवर यांनी केले.आभार अमीर इनामदार यांनी केले.
फोटो - येळेवाडी ता.माण येथे शैक्षणिक साहित्य वाटपप्रसंगी उपस्थित मान्यवर
Comments
Post a Comment