सायबर सुरक्षेची महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून जनजागृती..!

बिजवडी,ता.17: वर्ये येथील रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूड ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सातारा, आणि क्विक हिल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने "सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा" प्रकल्पा अंतर्गत विद्यार्थी धीरज शिंदे आणि विद्यार्थीनी संचिता फाळके यांनी डिस्कळ येथे श्री शिवाजी विद्यालय डिस्कळ ता. खटाव जि. सातारा येथे जाऊन सायबर गुन्हे कसे होतात तसेच गुन्हे झाल्यास आपण काय केले पाहिजे याचे धडे देत विदयार्थ्यांच्यात जनजागृती करण्यात आली.
  या जनजागृती मध्ये सायबर गुन्हेगारी, सोशल मिडिया फसवणूक,सोशल इंजिनिअरिंग आणि डिजीटल सुरक्षता या सारख्या विषयावर प्रबोधन करण्यात आले विदयार्थी उद्‌धारना द्वारे चालू सुरक्षिते बाबत सजगतेचा संदेश देण्यात आला. सायबर धोके आणि सुरक्षिततेच्या उपाय योजना या विषयी माहिती देण्यात आली.
 श्री शिवाजी वि‌द्यालयाचे प्राचार्य डांगे सर यांनीही विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षतेवर मार्गदर्शन केले.
 या उपक्रमासाठी संस्थेचे संचालक डॉ.बी.एस  सावंत यांनी विशेष पुढाकार घेत मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे आयोजन संगणक विभाग प्रमुख डॉ.आर डी कुंभार,पी.ए. लोखंडे यांच्या सहकार्याने करण्यात आले त्यांनीही विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षितेवर मार्गदर्शन केले .
फोटो - डिस्कळ ता.खटाव येथील श्री शिवाजी विद्यालयात सायबर सुरक्षेची माहिती देताना विद्यार्थी...

Comments

Popular posts from this blog

चैतन्य अकँडमीतली शिस्त विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतेय...!- सौ.सोनियाताई गोरे ; दहिवडीत चैतन्य माणदेश पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न

छोटूकाकांच्या आध्यात्मिक कार्याच्या पाठीशी कायम....... ! - सौ.सोनियाताई गोरे ; छोटूकाका कुलकर्णी चैतन्य माणदेश पुरस्काराने सन्मानित

...79 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दादांची 45 वर्षांची अखंडीत पत्रकारिता...!