टीकेटी एचव्हॅक सोल्यूशन्स कंपनीची सामाजिक बांधीलकी...! सीएसआर निधीतून फौंडेशनला मदत

बिजवडी,ता.3: चाकण पुणे येथील औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेली टीकेटी एचव्हॅक सोल्यूशन्स कंपनीच्या सीएसआर निधी अंतर्गत नुकतेच वराळे,तळेगाव येथील अभिकांत फाऊंडेशन आणि तळेगाव मधील अजित फाऊंडेशन यांना किराणा साहित्याची मदत करत सामाजिक बांधीलकी जपण्याचे कार्य करण्यात आले आहे. 
  दि.२९ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या कार्यक्रमास टीकेटी एचव्हॅक सोल्यूशन्स चे सीएसआर प्रमुख अकील सर,राहुल पानसरे उपस्थित होते.पुणे स्थित ऊर्मी संस्थेने टीकेटी एचव्हॅक सोल्यूशन्स कडे पाठपुरावा करून अभिकांत फाऊंडेशन आणि अजित फाऊंडेशन या संस्थांना ही मदत मिळवून दिली.
सदर कार्यक्रमाचे  नियोजन ऊर्मी संस्थेचे राहुल शेंडे व किशोर पेडणेकर यांनी केले होते.

फोटो - तळेगाव पुणे येथे फौंडेशनला मदत करताना टीकेटी एचव्हॅक सोल्यूशन्स कंपनीचे पदाधिकारी व इतर मान्यवर

Comments

Popular posts from this blog

चैतन्य अकँडमीतली शिस्त विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतेय...!- सौ.सोनियाताई गोरे ; दहिवडीत चैतन्य माणदेश पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न

छोटूकाकांच्या आध्यात्मिक कार्याच्या पाठीशी कायम....... ! - सौ.सोनियाताई गोरे ; छोटूकाका कुलकर्णी चैतन्य माणदेश पुरस्काराने सन्मानित

...79 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दादांची 45 वर्षांची अखंडीत पत्रकारिता...!